प्रामाणिकपणा आणि मानवी मुल्ये जपणारे स्वच्छता सैनिक

जेव्हा कुठल्याही व्यक्तीकडून आपल्या बरोबरच्या संवादात किंवा व्यवहारात प्रामाणिकपणा आणि मानवी मुल्ये दिसून येतात,तेव्हा आपल्या सभोवतालच्या गोष्टी आणखी सकारात्मक दिसायला लागतात. आयुष्यात चांगली माणसे टिकून आहेत,याचा प्रत्यय येत एक नवी आशा निर्माण होते. असाच प्रत्यय नुकतेच काही घटनांमुळे आला. आमच्या स्वच्छता सैनिक आणि गाडी चालकांनी हरवलेल्या वस्तू मुळ मालकांना सुखरूप परत केल्या.पहिल्या घटनेत ड्राईव्हर महेश साबळे व ऑपरेटर रोहित साठे यांना सापडलेला उच्च किंमतीचा मोबाईल फोन परत केला,तर दुसऱ्या घटनेत सुपरवायझर विवेक खडतरे व सुपरवायझर दिनेश भंडारी,ड्राईव्हर अनिल साबळे आणि ऑपरेटर प्रज्वल जगदाळे यांनी आधार कार्ड,क्रेडिट कार्ड,ड्रायव्हिंग लायसन्स असे मौल्यवान दस्ताऐवज असलेली पर्स परत केली.त्यांच्या प्रामाणिकपणाचे या वस्तूच्या मुळ मालकांनी कौतुक केले.या सर्व स्वच्छता सैनिक व ड्रायव्हरना सुपरवायझर फारूख बांगी यांचे मार्गदर्शन मिळाले. 


त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) च्या कार्यालयात विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी एपीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णन कोमांडूर,मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे, सरव्यवस्थापक आशिष मराठे आणि लीड वॉलेंटियर सत्या नटराजन उपस्थित होते.

या फक्त दोन घटनाच नव्हे तर अशा गोष्टी वारंवार अनुभवल्या जातात आणि प्रत्येक वेळेस त्या मुळ मालकापर्यंत कुठलीही अपेक्षा न करता सुखरूप पोहचविली जातात.त्यासाठी एक रचनात्मक प्रक्रिया आहे,ज्याआधारे ती वस्तू पुन्हा दिली जाते.

Popular posts from this blog

From Awareness to Action: Building Cleaner Cities Together through collaboration

जेव्हा मनातल्या कल्पना प्रत्यक्षात उतरतात..

Inspiring Collaboration for a Greener Tomorrow